पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाहणारे रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय!

*वाहणारे रक्त थांबवण्याचे घरगुती उपाय!* मुंबई : शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते. मात्र हे वाहणारे रक्त थांबवायेच कसे, हा प्रश्न आहे. त्यावर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. या घरगुती उपायांनी ६० सेकंदात रक्त वाहणे थांबेल. पहा कोणते आहेत ते उपाय... *टी बॅग्स * रक्त थांबवण्याचा हा आश्चर्यकारक उपाय आहे. एक टी बॅग पाण्यात बुडवून जखमेवर लावा आणि १० मिनिटांपर्यंत दाबून धरा. रक्त वाहणे थांबेल. *बर्फ* रक्त थांबवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बर्फ लावणे. जखमेवर बर्फ लावल्याने रक्त लवकर क्लॉट होते आणि दुखण्यावरही आराम मिळेल. *हळद* हळदीत जखम भरण्याची क्षमता असते. जखमेवर हळद लावल्याने रक्त कलॉट होण्यास मदत होते. त्याचबरोबर इंफेक्शनपासूनही संरक्षण होते. *फटकी* फटकीत अनेक मिनरल्स असतात. रक्त लवकर क्लॉट होण्यास मदत होते. यासाठी फटकी थोड्या पाण्यासोबत उगाळा आणि त्यानंतर जखमेवर लावा. रक्त क्लॉट होण्यास मदत होईल. *मीठ* मीठ हा देखील रक्त रोखण्याचा चांगला उपाय आहे. तोंडातील अल्सरपासून रक्त रोखण्यासाठी मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या पाण्याने आपण गुळण्या करतो त्याचप्रमाणे जखमेतून येण...

शरीरावरील खाज

शरीरावरील  खाज  - - - - - कारणे  -- संसर्ग   होणे ,  अति  उष्ण   पदार्थ   जास्तच  खाणे ,  अजीर्ण   होणे ,  शौचास  साफ  न  होणे ,  रक्तात  दोष  निर्माण  होणे ,  जडान्न  घेणे.  इ. उपाय  --- १)  वरील  कारणे  कमी  करा.  आणि  नियमित  प्राणायाम  करा. २)  B -  Tex  मलम  खाजेवर  सकाळसंध्याकाळ  लावा. ३)  कोरफड  पानातिल  गर  /  कोरफड  जेल  चांगला   चोळून  चोळून  लावा. ४)  एक  ग्लास  साधे  पाणी  आणि  एक  चमचा  मध  मिक्स  करुन  रोज  सकाळी  रिकाम्या  पोटी  घ्या.  लवकर  लाभ  होतो.  सर्व  प्रकारचे  त्वचा  विकार  नष्ट  होतात. ५)  आयुर्वेदिक  साबणानेच  स्नान  करा. ६)  खोबरेल  तेलात ...

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय! By Dipali Nevarekar शरीरावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी करा काही घरगुती उपाय !   त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. जितके जास्त खाजवाल तितकी खाज  (कंड) जास्त येते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून  संसर्ग होण्याचा धोका असतो. मग यापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच  हे काही  नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 1) खोबरेल तेल कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून  रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा. 2) पेट्रोलियम जेली जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे ! पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते.त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे...

मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हालं

* मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हालं* अनियमित मासिकपाळी खूप कमी गोष्टींचे कमतरता असल्याचे लक्षण/चिन्ह असू शकते; पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. हे तुमच्या अंडाशयातून अनियमित उत्सर्ग होण्याचे वा कधीकधी अजिबात न होण्याचे लक्षण असते. अंडपेशीशिवाय गर्भधारणा अशक्य असते; म्हणून जितका तुमचा अंडाशयातून उत्सर्ग कमी होईल, तितकी तुमची गर्भधारणेची शक्यता कमी राहील. गर्भधारणा ही सोपी गोष्ट नसते. नियमित मासिकपाळी येणाऱ्या महिलांची अकरा ते तेरा मासिक चक्रे होतात; म्हणजे त्यांना गर्भधारणेसाठी वर्षातून जास्तीत जास्त १३ संधी उपलब्ध असतात. ज्यांची मासिकपाळी अनियमित असते ; त्यांचे गर्भधारणेचे प्रमाण ३०-४० टक्क्यांनी कमी होते. म्हणून तुमचा पालकत्वाचा प्रवास हा दीर्घ आणि थकवणारा असू शकतो; पण यामुळे तुम्ही निरुत्साही होऊ नका. कारण अनियमित पाळ्यांबरोबरही गरोदर राहणे शक्य आहे. तुम्हाला प्रथम अनियमित पाळीमागचे कारण समजून घ्यावे लागेल आणि त्यात कशी सुधारणा आणावी, हे शोधावे लागेल. हे करणे तुम्हाला पालकत्वाच्या प्रवासात मोलाची मदत करेल! 'मासिकपाळी असताना देखील गरोदर बनण्याची शक्यता कशी वाढवावी?...

कॉपर टी म्हणजे काय ?

*कॉपर टी म्हणजे काय ?* तुम्ही कॉपर-–टी या गर्भनिरोधक पद्धतीबद्दल नक्कीच ऐकले असेल. हे एक गर्भधारणा रोखण्यासाठी वापरले जाणारे उपकरण ( IUD ) आहे. हे प्लास्टिक आणि तांब्यापासून बनवले जाणारे छोटे आणि लवचिक असे साधन आहे. डॉक्टरांच्या मदतीने अतिशय सोप्प्या रीतीने हे गर्भाशयात बसवून घेते येते. हे उपकरण दीर्घ आणि निश्चित काळासाठी काम करते आणि आपल्या इच्छेनुसार याला काढूनही टाकता येऊ शकते. कॉपर-टी चे फायदे आहेत परंतु सगळ्यांसाठीच हे लाभदायक असेल असे खात्रीने सांगता येत नाही. (IUD) चे दोन प्रकार आहेत आणि कॉपर-टी हे त्यापैकीच एक आहे. *१. संप्रेरकीय गर्भनिरोधक ( हार्मोनल IUD)* हार्मोनल गर्भनिरोधक लेवोंनरगेस्टरल नावाचे कृत्रिम संप्रेरक शरीरात सोडतात. ह्या संप्रेरकात प्रोजेस्टेरोन असतात. प्रोजेस्टेरोन एक संप्रेरक आहे जे मासिक पाळी दरम्यान अंड्याची निर्मिती होण्यास रोखते जेणेकरून अंडे गर्भात रुजणार नाही आणि गर्भधारणा होण्यापासून रोखली जाते. संप्रेरक गर्भनिरोधक (IUD) हे कॉपर-टी (IUD)पेक्षा जास्त परिणामकारक असतात. *२. कॉपर –टी (IUD)* हे सर्वात जास्त वापरले जाणारे गर्भनिरोधक आहे. हे तांब्याच्या ...

दुखणे

*कंबर दुखणे:* 1. विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते. 2. योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात ) 3. सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा. *घुडघे दुखणे:* 1. आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो. त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी! म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम. 2. गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात. ते रोज 10 मिनिटे करणे अति उत्तम. 3. शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत. 4. प्रचंड वेदना नसतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल (...

तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!

तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!  वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदेहोतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही. जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे दहा फायदे... १. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते. २. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही. ३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. ४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. ५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते. ६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं. ७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं. ८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो. ९. शुद्ध तुपामुळे ...

कानाचे आरोग्य सांभाळत कानातील मळ साफ करण्यासाठी या '10' गोष्टी लक्षात ठेवा

⭕कानाचे आरोग्य सांभाळत कानातील मळ साफ करण्यासाठी या '10' गोष्टी लक्षात ठेवा⭕ कान नेमका कसा साफ करावा याबाबच्या ENT स्पेशॅलिस्ट टीप्स नक्की जाणून घ्या कानामध्ये मळ जमा होण्याचा त्रास अनेकांमध्ये असतो. पण वरकरणी फारशी त्रासदायक किंवा वेदनादायक न वाटणारा त्रास खरंच दुर्लक्षित केला तर  चालेल का ? असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच Apollo Spectra Hospitals चे सिनियर कन्सल्टंट डॉ अशीम देसाई यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या आणि तुमच्या मनातील हे ’10′ प्रश्न दूर करा. 1.किती दिवसांनी कान स्वच्छ करावेत ? कानामध्ये मळ साचायला सुरवात झाली की कान स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र नियमित किंवा आठवड्यातून दोनदा कान स्वच्छ केल्याने कानात दाह किंवा शुष्कपणाचा त्रास वाढू शकतो. 2.कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती ? कानाचा बाहेरील भाग सुती आणि मऊ कापडाने स्वच्छ करा. तर कानाच्या आतील भाग बेबी ऑईल, एअर ड्रॉप किंवा मिनरल ऑईलचे थेंब टाकून स्वच्छ करावेत. 3.कोणत्या परिस्थितीमध्ये विशेष लक्ष देणं गरजेचे असते? कानामध्ये तीव्र वेदना जाणवत असल्यास, ऐकण्यामध्ये त्रास जाणवत असल्य...

सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारण

सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारणं. १.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत. -सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रास होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूती समयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रास होत नाही. २.गर्भाशयातील पाणी कमी झालंय. -गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी प...