पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औषधाच्या गोळीवर मधोमध रेघ का असते? ८० टक्के लोकांना माहीत नाही खरे कारण... आपण सगळ्यांनीच कोणत्या ना कोणत्या आजाराच्या निमित्ताने औषधाची गोळी खाल्ली असेल, पण तिच्यावर असणाऱ्या रेघेचा विचार कधी केला का?

इमेज
औषधाच्या गोळीवर मधोमध रेघ का असते? ८० टक्के लोकांना माहीत नाही खरे कारण... डोकेदुखीपासून ते तापापर्यंतची औषधे बहुतेक घरांमध्ये उपलब्ध असतात ज्यामुळे एखाद्याची तब्येत अचानक बिघडली तर त्यावर प्राथमिक उपचार करता येतात. तर काही घरांमध्ये वृद्धांना नियमितपणे औषधे दिली जातात. त्यामुळे औषधांच्या गोळ्यांचे विविध आकार, रंग तुमच्याही पाहण्यात आले असतील. या औषधांच्या रंगावरून केमिस्ट सांगू शकतात की कोणते औषध कोणत्या वेळी घ्यावे किंवा खायला द्यावे. अशा गोळ्यांमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मध्यभागी सरळ रेषा असते; पण का? याबद्दल अनेकांना माहिती नसते, चला त्याबद्दल जाणून घेऊ. प्रत्येक गोष्टीच्या रचनेमागे, निर्मितीमागे विशिष्ट कारण असते. औषधांच्या बाबतीतही त्यांचे रंग, रूप, आकार आणि त्यावरील रेघ या सगळ्यांचा अभ्यासकांच्या नजरेतून बारकाईने विचार केला जातो. तूर्तास आपण गोळीवरील रेघेचे वैशिष्ट्य जाणून घेऊ. गोळ्या सहज तोडण्यासाठी गोळीवरील रेषेचा मुख्य उद्देश टॅब्लेटला अर्ध्या किंवा लहान भागांमध्ये विभाजित करणे आहे, जेणेकरून ती सहजपणे तोडणे शक्य होते. हे विशेषतः जेव्हा रुग्णाला संपूर्ण गोळी ऐवजी अर्ध...

ऐरेंडेल तेल (castor oil)

इमेज
अनेक प्रकारचे आजारांवर रामबाण उपाय : एरंडेल तेल !!* रात्रीचं जागरणं, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे अनेकांना पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात. हे तेल पहाटे घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो. हे तेल इतकं गुणकारी आहे की, ज्यांना वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्यासारखं वाटतं, पोट साफ होत नाही असे त्रास होतात. या त्रासांमुळे ह्रदयविकार उद्भवण्याचीसुद्धा शक्यता असते, हे त्रास वेळच्या वेळी थांबवायचे असतील, तर आयुर्वेदात एरंडेल तेल पिण्याचा सल्ला दिला जातो. हे तेल शरद आणि वसंत ऋतुत घ्यावे. वसंत ऋतुत उष्णता वाढलेली असते. यामुळे ऋतुनुसार शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि प्रकृतीत होणारे त्रास टाळण्यासाठी एरंडेल तेल प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. पोट साफ होण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या चुर्णांचा वापर करतात. यावर एरंडेल तेल प्यायल्यास फायदेशीर ठरते. कोठा साफ होण्याकरिता वर्षातून दोन वेळा तरी शरद आणि वसंत ऋतुत...