डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय 
*डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय :-* *डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. *अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. *पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. *सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे. *केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५...