पंचामृताचे फायदे

💥💥💥💥💥💥💥💥💥💥
          *# पंचामृताचे फायदे #*
१. स्मरणशक्ती वाढते
२. शरिर निरोगी राहते
३. acidity साठी उत्तम उपाय
४. शक्तिवर्धक आहे
----
घटक
साखर १ चमचा
मध १ चमचा
ताजे दही २ चमचे
साजुक तूप २ चमचे
कोमट दुध ५ चमचे
(वरील प्रमाणात आणि वरील क्रमाने)
हे रोज घेतल्यास, शरीर शक्ति, स्फ़ुर्ति, स्मरणशक्ती वाढते, कान्ति उजळते, ह्रदय मेन्दू ह्यान्चे पोषण होते. वात्-पित्त-कफ ह्या त्रिदोषान्चे सन्तुलन होते.
ह्या पन्चाम्रुत मधे चिमुट भर केशर घातल्यास अजुन फ़ायदेशिर. केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्त शुध्दी करणारे आहे.
पंचामृत -
पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेऊ नये. दोहोंपैकी एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.
दूध -
गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे.
शेळीचे दूध हे ही पथ्यकर असते.
म्हशीचे दूध पचायला जड असते.
- दूध तापवून प्यावे.
- दूध कुठल्याही आंबट फळाबरोबर, मासे, खार्‍या पदार्थांबरोबर घेउ नये. त्यामुळे शरीरात विषारे उत्पन्न होतात.
दही -
दही खाताना थंड असले तरी पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते.
गोड, व्यवस्थित लागलेले दही पुष्टीकर असते. अर्धवट लागलेले किंवा आंबट दही रक्त दुषित करून त्वचाविकार निर्माण करते, सूज वाढवते.
- दही गरम करू नये.
- दही रात्री खाउ नये.
- सर्दी, खोकला असताना दही खाऊ नये.
तूप -
तूप भूक वाढवणारे, स्मृति, बुद्धी वाढवणारे, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांची आग होणे, दुखणे, चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त.
- अजीर्ण असताना तूप खाऊ नये.
- पोट साफ होण्यासाठी रात्री झोपताना गरम दूध + तूप घ्यावे.
- नाक लाल होऊन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे.
- डोळ्यांसाठी तूप, मध साखर रोज खाल्ल्याने फायदा होतो.
मध -
मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे.
- मध गरम करून अथवा उष्ण पदार्थांसह खाऊ नये.
- डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो.
- मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते.
- तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.
साखर / गूळ - तहान कमी होते.
- खडीसाखर सगळ्यात श्रेष्ठ आहे.
पंचामृताचे फायदे :
- शरीर पुष्टी करते
- पोटात आग पडणे, जळजळ थांबवते
- मानसिक शांति देते
- Stress कमी करून चिडचिड कमी होते
- बुद्धीवर्धक
- वजन वाढते
- सकाळी उठल्याबरोबर घेतले तर अर्धशिशीवर उतार मिळतो.
💥💥💥💥💥💥💥💥💥

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कानात गोम गेल्यास किंवा चावल्यास काय करायचे उपचार

डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय 

शरीरावरील खाज