दुखणे

*कंबर दुखणे:*

1. विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.

2. योग्य नत्रयुक्तपदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे आहारात असणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची होणारी झीज योग्यवेळी भरून निघून परत कामाचा ताण सहन करण्यासाठी शरीर तयार राहील( योगासनातील चक्रासन नियमितपणे केल्यास कंबर दुखीच्या जुन्या तक्रारी निश्चितपणे दूर होतात )

3. सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.

*घुडघे दुखणे:*

1. आपले संपूर्ण वजन आपला गुडघा उचलतो. त्यामुळे आपले वजन जेवढे कमी तितका गुडघ्यावरचा भार कमी! म्हणून तरुणपणापासूनच आपले वजन आटोक्यात ठेवणे अति उत्तम.

2. गुडघा दुखू लागला तर लगेचच काळजी घेऊन वजन कमी करण्याच्या मागे लागावे. गुडघ्याच्या भोवती असलेले स्नायू बळकट होतील असे सोपे व्यायाम शिकवण्यात येतात. ते रोज 10 मिनिटे करणे अति उत्तम.

3. शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.

4. प्रचंड वेदना नसतील तर स्वत:हून फक्त पॅरॅसिटेमॉल (उदा. क्रोसीन)ची गोळी घ्यावी किंवा मलम लावावे.

5. सुरुवातीला पट्टे (नी-कॅप) वापरणे चालू शकते. परंतु त्याचा अतिवापर टाळावा कारण त्याने स्नायू शिथिल होतात.

6. वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो.

7. उत्तम प्रतीची पादत्राणे वापरल्यानेसुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.

*सांधेदुखी:*

१. सांध्यावर ताण पडणार नाही याची काळजी घेणे. त्यासाठी ओझी न वाहने, सारखी उठ बस न करणे, वजन कमी करणे, खूप न चालणे हे उपाय करावेत.

२. सांध्याभोवातीच्या स्नायुंना व्यायाम देऊन ते बळकट करावेत, परंतु गुडघे, घोटे यावर ताण पडेल असा व्यायाम करू नये.

३. सांधे फार दुखल्यास तात्पुरता उपाय म्हणून पॅरासिटामोल गोळी घ्यावी.

4. जेव्हा सांधेदुखी ही वातामुळे असते किंवा झीज झाल्यामुळे असते तेव्हा सांध्यावर कोणतेही औषधी तेल किंवा तीळ तेल लावून शेक घेतल्यास आराम मिळतो.

5. जेव्हा ही सांधेदुखी आमामुळे होते तेव्हा तेल लावल्याने आराम मिळत नाही उलट दुखणे वाढते, म्हणून या आमामुळे होणा-या सांधेदुखीवर पंचकर्म, औषधी, पथ्य किंवा हलका व्यायाम फार आवश्यक आहे. थंड व शिळे पदार्थ टाळावेत.

6. प्रकूपित रक्तातील दोषामुळे होणा-या सांधेदुखीवर दीर्घकाळ औषधी, पंचकर्म, पथ्य आवश्यक असते. ज्यामुळे आपणास दीर्घकाळ आराम मिळतो.

7. सध्याच्या या जगात वाहनांचा वापर, फास्ट फूड व जेवणाच्या व झोपण्याच्या अवेळा यामुळे वजन वाढते. त्यामुळे सांधेदुखी होते. या सांधेदुखीत झीज/आम/प्रकूपित रक्तातील दोष कारणीभूत ठरतात.

8. सांधेदुखी झाली की, तेल चोळण्याकडे रुग्णांचा कल असतो. काही विशिष्ट औषधी तेल वगळता इतर कोणतेही तेल लावल्यास आमवाताचा त्रास वाढतो. त्यामुळे आमवाताच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तेल लावू नये.

9. योगराज गुग्गुळ, रास्नासप्तक काढा, गंधर्व तेल, अशी वातनाशक औषधी घ्यावी. याबरोबरच रुक्ष स्वेद, वैतरण, बस्ती अशा पंचकर्म उपचारांनी आमवाताचे रुग्ण कायमचे बरे होऊ शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कानात गोम गेल्यास किंवा चावल्यास काय करायचे उपचार

डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय 

शरीरावरील खाज