मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हालं
*मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हालं*
अनियमित मासिकपाळी खूप कमी गोष्टींचे कमतरता असल्याचे लक्षण/चिन्ह असू शकते; पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. हे तुमच्या अंडाशयातून अनियमित उत्सर्ग होण्याचे वा कधीकधी अजिबात न होण्याचे लक्षण असते. अंडपेशीशिवाय गर्भधारणा अशक्य असते; म्हणून जितका तुमचा अंडाशयातून उत्सर्ग कमी होईल, तितकी तुमची गर्भधारणेची शक्यता कमी राहील. गर्भधारणा ही सोपी गोष्ट नसते. नियमित मासिकपाळी येणाऱ्या महिलांची अकरा ते तेरा मासिक चक्रे होतात; म्हणजे त्यांना गर्भधारणेसाठी वर्षातून जास्तीत जास्त १३ संधी उपलब्ध असतात.
ज्यांची मासिकपाळी अनियमित असते ; त्यांचे गर्भधारणेचे प्रमाण ३०-४० टक्क्यांनी कमी होते. म्हणून तुमचा पालकत्वाचा प्रवास हा दीर्घ आणि थकवणारा असू शकतो; पण यामुळे तुम्ही निरुत्साही होऊ नका. कारण अनियमित पाळ्यांबरोबरही गरोदर राहणे शक्य आहे. तुम्हाला प्रथम अनियमित पाळीमागचे कारण समजून घ्यावे लागेल आणि त्यात कशी सुधारणा आणावी, हे शोधावे लागेल. हे करणे तुम्हाला पालकत्वाच्या प्रवासात मोलाची मदत करेल!
'मासिकपाळी असताना देखील गरोदर बनण्याची शक्यता कशी वाढवावी?' हा प्रश्न तर तुम्ही स्वतःला नेहमीच विचारत असाल! ही शक्यता वाढवण्यासाठी ध्यानात घ्याव्यात अशा काही गोष्टी म्हणजे:
*१. निरोगी अन्न आणि संतुलित आहार*
भरपूर भाज्या, फळे खायचा प्रयत्न करा आणि ज्यांमध्ये कर्बोदके आणि फॅटचे प्रमाण जास्त असते, असे पदार्थ खाणे टाळा.
*२. शरीराकृती योग्य ठेवा*
जर तुम्ही स्थूल असाल; तर कर्बोदकांचे प्रमाण कमी करून काही किलोग्रॅम वजन कमी करणे फायदेशीर ठरते. तसेच जर तुमचे वजन कमी असेल; तर काही किलोग्रॅम वजन वाढवायचा प्रयत्न करा. कारण शरीरातील कमी फॅटमुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे पाळी अनियमित होऊ शकतात.
*३. नियमित व्यायाम करा*
गर्भधारणेमध्ये नियमित व्यायाम हा मोलाची भूमिका बजावतो; पण तुम्हाला भान राखून व्यायाम करावा लागेल. कारण भरपूर ताण हा अनावश्यक परिणाम करू शकतो.
*४. गर्भधारणेची सप्लीमेंट्स*
अशा विटामिन सप्लीमेंट्स चे सेवन हे वाढणाऱ्या गर्भासाठीच्या आवश्यक पोषकतत्त्वांची योग्य पूर्तता करते.
याबरोबरच असे मानले जाते की, काही वनौषधी आणि जीवनसत्त्वांमुळे हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित राहते, मासिक चक्र नियमित होते आणि अंडाशयाच्या उत्सर्गाची वारंवारिता वाढते.
*५. ओव्ह्युलुशन *
यापुढचा टप्पा म्हणजे प्रत्येक मासिक चक्राचे अचूक मूल्यमापन करणे आणि समागम योग्यवेळी करण्यासाठी तुमच्या अंडाशयाचा उत्सर्ग कधी होईल, याचा अंदाज बांधणे. अनियमित पाळी असणाऱ्या महिलांसाठी हा अंदाज बांधणे हा त्रासदायक विषय असतो. हे सोपे करण्यासाठी 'इलेक्ट्रॉनिक फर्टिलिटी मॉनिटर' ची मदत घेणे योग्य ठरते.
जरी अनियमित पाळी हे गरोदर बनणे अवघड करून टाकते; तरी तुमच्या लहान छकुल्याला हातात धरणे हे यामागील सर्व प्रयत्न आणि त्यागांना आणखी विशेष बनवते! तसेच पालकत्वासाठी तुम्ही जितके कष्ट सोसले आहे; तेच तर त्याला विशेष अनुभूती प्रदान करते, नाही का?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा